SEO म्हणजे काय ? What is SEO in Marathi ?

SEO म्हणजे काय ? What is SEO in Marathi

एसईओ म्हणजे काय ? ( SEO in Marathi ) आपण दररोज गुगल वर सर्च करतो , तर त्या संदर्भात जे आपल्याला निकाल खाली मिळतात त्या पैकी आपण पहिला पर्याय निवडून त्या लिंक वर जातो आणि माहिती पाहतो. परंतु आपण कधी विचार केला का हा पर्यंत ती लिंक का नंबर १ वर आहे तर त्या मागचे गुपित म्हणजे SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ब्लॉगिंग करताना हे सर्वात महत्वाचे कार्य आहे आणि लोक जोडण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारे हे साहित्य. आज आपण त्या बद्दल माहिती घेऊ SEO म्हणजे काय ?

SEO चे दोन प्रकार आहेत !

१ – ऑन पेज एस.इ.ओ (On Page SEO)
२ – ऑफ पेज एस.इ.ओ (Off Page SEO)

ऑन पेज एस.इ.ओ (On Page SEO) | SEO म्हणजे काय ?

ऑन-पेज एसइओला “ऑन-साइट” एस.इ.ओ म्हणूनही ओळखले जाते

आपण आपल्या वेबसाईटला सर्वोत्तम रँकिंग मिळावं म्हणून आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्या वेबसाईट वर किंवा वेब पेज वर परफॉर्म करतो त्याला ऑन पेज एस.इ.ओ म्हणतात

ऑन पेज एस.इ.ओ मध्ये बरेच मुख घटक असतात त्यांचे निकष पूर्ण केले तर आपल्या ब्लॉग चे SEO उत्तम प्रकारे होते आणि आपल्याला गुगल च्या सर्च रिझल्ट मध्ये ब्लॉगला पहिले स्थान सुद्धा मिळू शकते.

पानाचे नाव ( Page Title )

पानाचे शीर्षक हे गुगल सर्च मध्ये आले पाहिजे अश्या प्रकारचे शीर्षक आपण लेखाच्या आधारे लिहले पाहिजे. कारण हे शीर्षक गूगल चे bot आपल्या साइटमॅप मधून गुगल वर लिंक करतात.
उदा

मेटा टॅग (description)

मेटा टॅग गुगल सर्च मध्ये आपल्या वेब किंव्हा ब्लॉगल लिंक च्या खाली असते ज्या मध्ये थोड्या प्रमाणात माहिती असते, जसे ब्लॉग मध्ये काय आहे कोणत्या माहिती आहेत आणि काय विषय आहे ब्लॉग चा हे स्पष्ट होते.

URL वेब पत्ता

जेव्हा आपण साइटमॅप गुगल ला सबमिट करतो त्यात सर्वात आधी गुगल आपल्या ब्लॉग चा पत्ता म्हणजे URL बघतो त्यात आपल्या लेखातील keyword किंव्हा key phrase हे असणे आवश्यक आहे तत्यामुळे गुगल ला कळते कि हा लेख अथवा पोस्ट कोणत्या संदर्भात आहे आणि गुगल मध्ये त्या लेखाचे शीर्षक सर्च केले असता ते गुगल च्या सर्च मध्ये दाखवले जाते.

इंटर्नल लिंक

गुगल चे bot जेंव्हा एखादे आर्टिकल किंव्हा पेज क्रॉल करतात तेव्हा त्या पानावरील किंव्हा लेखामधील ज्या ज्या लिंकन तेथे आढळतात त्या लिंक वर सुद्धा गुगल चे bot क्रॉल साठी जातात त्या मुळे आपल्या इतर पोस्ट ला गुगल इंडेक्स करता तर इंटर्नल लिंक ने लिंक करून घेणे कधी पण उत्तम.

Alt tag

हे टॅग फोटो साठी खूप महत्वाचे आहे आपण गुगल वर फोटो सर्च करतो त्यात फोटो कसे येतात किंव्हा गुगल कसे बरोबर त्या फोटो ला ओळखतात हे केवळ Alt tag मुळे शक्य होते. Alt tag आपण फोटो ला दिले तर गूगल त्या फोटो ला ओळखू लागतो आणि आपण सर्च केले असता ते फोटो गूगल वर दिसू लागतात, म्हणनू ब्लॉग मध्ये ना विसरता फोटोना Alt tag द्यावा.

पेज स्पीड | SEO in Marathi

पेज स्पीड ह्या कारणानं मुळे बरेच ब्लॉग गूगल च्या सर्च मध्ये किंव्हा SEO उत्तम करून सुद्धा आपल्याला अडथळे निर्माण करतात. कसे ?
आपण जेंव्हा होस्टिंग निवडतो तेव्हा आपण पैसे पाहून जे स्वस्त आहे ते विकत घेतो, पण आपण मराठी मध्ये ब्लॉग करत आहोत याचा अर्थ या आपला वाचक वर्ग हा केवळ भातात आहे. आणि त्या नुसार आपल्याला पेज जलद गतीने लोड होण्यासाठी आपल्या ब्लॉग चे सर्वर भारतात असणे खूप गरजेचे आहे. आपण माझा लेख वाचू शकता मी ज्यामध्ये होस्टिंग कशी निवडावी हे सांगितले आहे.

ऑफ पेज एस.इ.ओ (Off Page SEO) | SEO म्हणजे काय ?

ऑफ पेज एस.इ.ओ मध्ये Google ला आपण सांगतो इतरांना आपल्या साइटबद्दल काय वाटते, सोसिअल मीडिया द्वारे आणि आपला वाचक वर्ग आपल्या ब्लॉग ला कुठे कुठे शेर करता त्यावर हे अवलंबून असते.

लिंक्स सबमिशन

आपल्या ब्लॉग मधील पानांची अनेक माध्यमात लिंक शेर केली जाते, त्यात लिंक मुळे गूगल ला कळते की हे किती लोकप्रिय आहे आणि त्या आधारे गूगल आपल्याला सर्च इंडेक्स मध्ये आपल्या ब्लॉगची जागा ठरवतो. म्हणून लिंक सबमिशन खूप महत्वाचा विषय आहे SEO मधला.

कन्टेन्ट | What is SEO in Marathi ?

आपण आपले लेखन स्वतःच केलेले असले पाहिजे कारण गुगुल कॉपी पेस्ट केलेले लेख लगेच ओळखून घेते आणि आपल्याला रँकिंग मध्ये त्याचा दुषपरिणाम मिळतो आणि गुगळे पेज रँक करत नाही. तर कोणाचे हि लेख कॉपी करून आपल्या ब्लॉग वर पेस्ट करून हि चूक करू नका.

Leave a Comment