- आधार कार्डची प्रत
- बँक पासबुकची प्रत
- पॅन कार्डची प्रत
- शेतकऱ्याच्या प्रतिज्ञापत्राची किंवा कर्जाची प्रत
- प्रकल्प अहवाल
मशरूम पीकाच्या लागवडीसाठी आणि युनिट स्थापनेसाठी अंदाजित किती रक्कम अनुदानात दिली जाते?
महाराष्ट्रात मशरूम उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमांतर्गत, आपले राज्य सरकार मशरूम पीकाच्या उत्पादन आणि स्पॉन आणि कंपोस्ट युनिटसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देते. तर एखाद्या शेतकऱ्याने जर 20 लाख रुपये शेतीत खर्चून मशरूम युनिटची उभारले, तर त्याला मशरुम युनिटच्या किंमतीच्या 40 टक्के रक्कम म्हणजे रुपये 8 लाख प्रतियुनिट सबसिडी दिली जाते.
